
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील आंबुलगा ग्रा.पंचायत कार्यालयांतर्गत मौजे पिंपळाचीवाडी येथील शालेय शिक्षण समितीची निवड पार पडली. यावेळी अध्यक्ष दत्ता मारोती मुंडे तर उपाध्यक्षपदी माधव भगवान मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळाचीवाडी येथील पहिली ते चौथी शाळा असून या शाळेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी साठी दि.16 मार्च रोजी तून कार्यकारणी निवडण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलविण्यात आले होते. या वेळी प्रत्येक वर्गातून दोन दोन पालक घेण्यात आले.
यामध्ये 50 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आले शाळेत पार पडलेल्या निवडणूक दरम्यान पालकांतून निवडलेल्या निवडणूक दरम्यान पालकांतून निवडलेल्या सदस्यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध शालेय व्यवस्थापन समिती कार्यकारणी निवडण्यात आली. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून दत्ता मारोती मुंडे उपाध्यक्ष म्हणून माधव भगवान मुंडे या समितीचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अंजनीकर सोनाली शंकराव सदस्य पदी पुजा परशुराम मुंडे. बेबी शिवहरी मुंडे. शेकुंतला अर्जुन मुंडे. प्रयाग काशिनाथ मुंडे. भिम गोविंद मुंडे यांची निवड करण्यात आली.
असून त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी नुतन कार्यकारणी समितीने शाळेच्या विविध विकास कामासाठी व दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.शाळेचे मुख्याध्यापक अंजनीकर सोनाली शंकरराव यांनी सर्वांचे आभार मानले.