
दैनिक चालु वार्ता
माळाकोळी प्रतिनिधी
गणेश वाघमारे
लोहा :- लोहा तालुक्यामध्ये अनेक शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यापैकी आंबेसांगवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अनिता ढाकणे मॅडम विद्याताई चव्हाण पाटील मॅडम, राजकुमार देगलूरकर सर, यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी राजकुमार देगलूरकर सर यांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ,त्यांची कला क्रीडा व सामाजिक कार्यात आवड पाहून तालुकास्तरीय गुरू गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. तदेगलुरकर सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळेस प्रविण पाटील चिखलीकर साहेब, पं.समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे उपसभापती नरेंद्रजी गायकवाड, गोविंद नांदेडे साहेब ,गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के साहेब ,जिल्हाधिकारी ईटनकर साहेब ,वर्षाताई ठाकूर मॅडम, व अनेक मान्यवर,शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होते .लोहा तालुक्यातील एक शांत संयमी व्यक्तिमत्व व या व्यक्तिमत्त्वाचा राजकुमार देगुलकर सरांचा येथोचित सन्मान झाला या पुरस्काराबद्दल त्यांच्या मित्र नातेवाईक व पालक मंडळी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. गावकरी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आंबेसांगवी येथील शाळेत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असे देगलूरकर सर यांना असेच पुरस्कार मिळावेतत अशी भावना सर्वत्र व्यक्त होताना दिसून येते..