
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान हा सध्या त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.
यात शाहरुख खानच्या स्टाईलचे सर्वजण कौतुक करत आहे. नुकतंच शाहरुख खानचा मित्र आणि अभिनेता सलमान खान याने ‘पठाण’ चित्रपटाबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. नुकतंच यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांनी सलमान खानला ‘पठाण’चे एक फुटेज दाखवले आहे. त्यानंतर सलमान खानने शाहरुख खानच्या ‘पठाण’बद्दल त्याचे मत सांगितले आहे.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या एका वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी आदित्य चोप्रा आणि सलमान खान एकत्र भेटले होते. त्यावेळी त्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरु होती. सलमान खानचा आगामी टायगर ३ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ या दोन्हीही चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहे. नुकत्याच झालेल्या एका भेटीदरम्यान आदित्य चोप्रा यांनी सलमान खानला ‘पठाण’ चित्रपटातील एक २० मिनिटांचे दृश्य असलेला व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान खानला काय वाटते, हे त्यांना जाणून घ्यायचे होते.