
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- खोट्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या लोकांच्या चौकशा सुरू होतात तेव्हा भाजपच्या प्रमुख लोकांना गुदगुल्या होतात. आता राज्यातले पोलीस एखाद्या गुन्ह्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांची चौकशी करू लागतात. तेव्हा त्यांनी त्याला सामोरे जावे, रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला करताय, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत भाजपला लगावला आहे. महाराष्ट्रातील पोलीस कधीही खोटे पुरावे दाखल करणार नाहीत असेही त्यांनी म्हटले.