
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- सकल मराठा समाज परतूर च्या वतीने अँड. वसंतराव साळुंखे यांना मराठा भुषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले , नुकतीच त्यांची महाराष्ट्र, गोवा, दिव-दमन , नगर हवेली (दोन राज्य आणि तीन केंद्र शासित प्रदेश ) च्या बार कॉउन्सिल च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जवळपास १लाख १० हजार मतदार आहेत यात कोणताही चुकीचा वापर न करता त्यानी हि निवडणूक जिंकली आहे , ते सादोळा ता माजलगाव येथील आहेत त्यांना कॉलेज जीवनापासूनच सामजिक कामाची आवड होती , 15 वर्षांपूर्वी सामूहिक विवाह चालू केले.
माजलगाव येथे मुलींसाठी वसतिगृह चालवले , आणि शेतकरी , गरीब लोकांची वकालत सामाजिक दृष्टीकोन समोर ठेऊन चालवतात आणि याचमुळे मी सतत बार कौन्सिल निवडून येतो असेमत व्यक्त केले. लोक 2 कोटी पर्यंत या निवडणुकीत खर्च करतात परंतु मी सामाजिक कामामुळे बगर पैश्याचा निवडून येतो , याच त्यांच्या कामामुळे त्यांना मराठा भुषण पुरस्काराने सन्मानित केले आहे , पुढे बोलताना आसे म्हणाले कि माझा हा सर्वात मोठा सन्मान आहे , ऑफिस ,आणि बार कॉउन्सिल ने सत्कार केले परंतु समाजाने केलेला हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे.
परतूर वकील संघाच्या वतीने ही सत्कार आयोजित करण्यात आला होता ,यावेळी रामेश्वर अण्णा नळगे ,मनोहर खलापुरे , कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. प्रा . भगवान दिरंगे , अशोकराव बरकुले , psi अंभुरे कमलाकर , तहसिल दार रूपा चित्रक , प्रा डॉ पांडुरंग नवल, रघुनंदन नवल उपस्थित होते,