
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मंठा :- दि.१४ मंठा शहरात एस.एस.सी.बोर्ड परीक्षेला दि१४ वार मंगळवार रोजी सुरुवात झाली आहे.सदरील परीक्षा ही यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संबंधित शाळेलाच परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. शहरातील परीक्षा केंद्रावर सगळीकडे कॉप्याच कॉप्या पुरवताना मुले व जेष्ठ मंडळी दिसून आली. या प्रकाराची चौकशी व वृत्त संकलन करण्यासाठी यासंदर्भात शहरातील एका नामवंत शाळेच्या परीक्षा केंद्रावर पत्रकार व ज्येष्ठ मंडळी गेली असता. तेथील केंद्र संचालकाने कॉप्या संदर्भात उडवाउडवीचे उत्तरे दिली व पत्रकारांना परवानगी नाकारली.
कॉप्या पुरवणाराऱ्यांना अधिकृत परवानगी दिली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अशा परीक्षेतून परीक्षा मंडळ काय साध्य करत आहे कोणत्या आधारावर विद्यार्थ्यांची मूल्यमापन होणार ?हुशार,गुणवंत विद्यार्थ्यांचे या प्रकारामुळे परीक्षेमध्ये शैक्षणिक नुकसान होणार हे निश्चित आहे या सर्व प्रकाराला संबंधित यंत्रणा जबाबदार आहे. तरी संबंधित प्रकाराला आळा बसावा व परीक्षा कॉप्या मुक्त व्हाव्यात, हुशार विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे आणि संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे.