
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर किनवट
किनवट :- आज दिनांक १६ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ कार व दुचाकीच्या भीषण अपघातात २ जन जागीच ठार झाले.त्यात वाळकेवाडी दुधड येथील गंगाधर माझळकर व केरबा हुरदुखे या दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम जवळील इंदिरानगर सरसम येथून किनवट रोडवर भरधाव वेगाने जाणारी किनवट कडे जाणारी कार नं.MH ४४G.१८८२ व घराकडे वाळकेवाडी ला जाणारी दुचाकी नं.MH २६ H ८४६१ चा समोरासमोर भीषण अपघात झालं.
त्यात मृत्य वाळकेवाडी – येथील गंगाधर माझळकर (२२)व केरबा हुरगुते( २१) यांचा समावेश आहे तसेच गणपत प्रल्हाद वागतकर व दिगंबर प्रल्हाद वागतकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत्य झालेले दुचाकी स्वार नेहमी प्रमाणे हिमायतनगर येथे आठवडी बाजार करून आपल्या गावी परत जात असताना दि १६ मार्च रोजी दुपारी तीनच्या दरम्यान काळाने त्यांच्यावर घात घाऊन त्यांची जीवन यात्रा संपली.कार मधील चालक व इतर दोघेजण अपघात होताच घटना स्थळावरून जखमींना कोणतीही मदत न करता त्यांनी पोबारा केला. हिमायतनगर पोलीस ठाण्यात कार चालकावर कारवाई करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. हा अपघातच नाही तर ह्या राष्ट्रीय महामार्गावर मागील काळात पण असेच अनेक अपघात झाले होते.
इंदिरानगर हे गाव महामार्गावर वळण रस्त्यावर असून नागरिकांची सतत ये जा चालू असते आणि वाहने भरधाव वेगाने येथून ये जा करतात.यामुळे अपघातांची संख्या वाढण्याचे मूळ कारण आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आता तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ह्याची दखल घेऊन येणाऱ्या काळात तरी येथे आर.टी. ओ. विभागाकडून वेग मर्यादा मिटर बसवुन ,स्पीड ब्रेकर बसवून किंवा येथे अपघात होऊ नये यासाठी उपाय योजना कराव्यात. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.घटनास्थळी हिमायतनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे,पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन,विष्णू इंगळे,सोपान यनगुलवार,हेन्द्रे आदी पोलीस टीम घटना स्थळाचा पंचनामा करण्यास उपस्थित होती.