
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर शहरातील शिवबा नगर व नाथनगर रामपूर रोड डी पी न. २०/डी पी न.-१९वरील सततच्या स्पार्किंग प्रोब्लेम ,आणि वारंवार व्होल्टेज कमी जास्त होणे ही समस्या नेहमीची झाली आहे,यामुळे वारंवार शिवबा नगर, नाथ नगर तसेच इतर भागात त्या प्रमाणात घरातील टी व्ही, कॉम्प्युटर, फ्रिज,इत्यादी साहित्याची नुकसानि होत आहे,वारंवार तक्रार करून सुद्धा ही समस्या सुटत नाही,मान्यवर साहेबांनी डी पी वर समायोजन करून दयावेत किंवा डी पी ला दुरुस्ती करून आमची समस्या सोडवावी ही नम्र विनंती केली.
समस्या चे समाधान न झाल्यास ठिय्या आंदोलन करू असे देगलूर तालुका मराठा महासंघ ईश्वर देशमुख ,राष्ट्रवादी विद्यार्थी विधान सभा अध्यक्ष शिवकुमार डाकोरे,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष सदाशिव शिंदे ,राष्ट्रवादी तालुका संघटक विजय कुमार पाटील भाटापुरकर, व इतर मराठा महासंघ देगलूर तालुक्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.