
दैनिक चालु वार्ता
मुखेड तालुका प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मौजे देगाव येथे आज दिनांक 16 रोजी जि. प. प्राथमिक शाळा देगाव तालुका मुखेड येथे इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका म्हणून कु. उडते श्वेता शिवाजीराव यांनी काम पाहिले तर सहशिक्षक म्हणून वैष्णवी रोटेवाड, अनुराधा कलबुर्गे, प्रतीक्षा झुंबरे ऐश्वर्या देवकते, वैष्णवी नवले, लक्ष्मी पेशटवाड, पुनम रोटीवाड, यांनी सहशिक्षक म्हणून पहिली ते आठवी या विद्यार्थ्यांना ज्ञानर्जना करून शिक्षक म्हणून काम पहिले तर.
सेवक म्हणून अर्जुन पवार यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम पाहिले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी बोलताना असे म्हणाले की विद्यार्थी हा नियमितपणे हे अभ्यासक्रम करून विद्यार्थी जीवनात परिपूर्ण अभ्यास करावे, व पुढे चालून मोठे स्वप्न असावे व मोठे स्वप्न उराशी बाळगा असे पाटील सर यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर सरके सर, जाधव सर, हिंगमिरे सर विठ्ठल कोंडे, डांगे सर, वडजे सर कळसकर मॅडम यांनी अदिंनी परीश्रम करून कार्यक्रम यशस्वी केले.