
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता चाकुर चे नेते ऊत्तमराव वाघ यांनी स्वखर्चातून दिले क्रुत्रिम स्टिक
चाकूर :- चाकूर तालुक्यातील मौजे शिरनाळ येथील अभिषेक बब्रुवान करले यांचे अचानक अपघाती दोन्ही पाये निकामी झाल्याने त्यांना चालता किंवा फिरता येत नव्हते त्यांना चालता फिरता यावे या साठी कृञिम स्टीक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांच्या वतीने भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणपतराव नितळे,राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव,युवा नेते अंकुश बोमदरे,सरपंच प्रियंका गोणे,उपसरपंच रामदास कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कांताबाई करले ,कोंडीराम करले,भालचंद्र गोणे आदीसह करले कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांचा करले कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.