
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद शहरामधील कचरा संकलनासाठी महापालिकेने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र शहरातील अनेक भागांमधील नागरिकांची, घंटागाडी नियमितपणे येत नाही, कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहतो, अशा तक्रारी असतात. स्मार्ट सिटीच्या वॉर रुममध्ये मागील पंधरा दिवसात अशा बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. मात्र ज्या भागात घंटागाडी नियमितपणे येत नाही, त्या नागरिकांनी पुढे येत महापालिकेकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वॉर रुमच्या वतीने सांगण्यात आले आहे.
एखाद्या भागात कचरा पडून असेल किंवा घंटागाडी वेळेवर येत नसेल तर नागरिकांना वॉर रुमकडे तक्रार करता येते. ही तक्रार 8055505002 किंवा 8055128080 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच व्हॉट्सअपवर तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.