
दैनिक चालु वार्ता
मुखेड तालुका प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- जिल्हा परिषदेच्या अर्थ संकल्पीय सभेपूर्वी जिल्हा परिषद मध्ये पत्रकार परिषदेचे उद्घाटन अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षामध्ये पत्रकारांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद मध्ये वृत्त संकलनासाठी येणाऱ्या पत्रकारांना बसण्यासाठी कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी पत्रकाराकडून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्याकडे करण्यात आली होती.
त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांच्या मागणीसाठी मागणीची पूर्तता केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपाध्यक्ष पदमा रेड्डी, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाज कल्याण सभापती रामराव नाईक , महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई बेटमोगरेकर, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांच्यासह बहुसंख्य सदस्य पत्रकार उपस्थित होते.