
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पाडल्या आहेत. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे रोड शो केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिंद्रा थारने गाडीने रोड शो केला. त्यावरून महिंद्राचे समुहाचे सर्वेसर्वो आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत पंतप्रधानांचे आभार मानले.
महिंद्राच्या ज्या एसयूव्ही कारमध्ये पंतप्रधानांनी रोड शो केला ते महिंद्राच्या थार कारचे ओपन मॉडेल होते. अनेक महागड्या गाड्यांनी पंतप्रधान रोड शो करू शकत असतानाही त्यांनी महिंद्राच्या कारचा वापर केला. भारतीय कंपनी महिंद्राने तयार केलेली थार कार देशात खुप लोकप्रिय आहे. स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल इंजिनसाठी या गाडीला पसंती दिली जाते.