
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
उदगीर :- प्रत्येक बाजारपेठेला ग्राहकांच्या इच्छा आकांक्षांची पार्श्वभूमी असते, त्या परिसरातील ग्राहकांची मानसिकता, खर्चाची क्षमता, वर्गवारी या बाबीवर बाजारपेठ बऱ्याच अंशी अवलंबून असते. त्यामुळे ग्राहक कसाही असो तो बाजारपेठेचा केंद्रबिंदू असतो. असे प्रतिपादन उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज दि.१७ मार्च रोजी उदगीर तहसील कार्यालयाच्या आवारातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक संजय उर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पारसेवार, लातूर जिल्हा प्रांत संरक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष अभिजित ओटे-पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उदगीर तालुका अध्यक्ष अजय सोनकांबळे, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, नायब तहसीलदार निवडणूक संतोष गुट्टे, नायब तहसीलदार पुरवठा एस.पी.बेंबळगे, नायब तहसिलदार महसूल संतोष धाराशिवकर, नायब तहसीलदार महसूल प्रकाश धुमाळ, नायब तहसीलदार संगायो प्रकाश कोठुळे उपस्थित होते.
नायब तहसिलदार संतोष गुट्टे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन लालबहादूर शाळेतील सहशिक्षिका श्रीमती अनिता येलमटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसीलदार प्रकाश कोठुळे यांनी मानले. यावेळी प्रमुख वक्ते व अतिथी पाहुणे यांनी जागतिक ग्राहक हक्क दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच ग्राहकांना असणाऱ्या विविध हक्कांबाबत माहिती दिली. तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे यांनी ग्राहक पंचायतचे कार्य व कामाची ओळख करून देत ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ व २००९ कायद्या २०१९-२० मधील कायद्याने मिळालेल्या हक्क व अधिकाराचा हक्क वापरावे असे सांगितले.
यावेळी ग्राहक चळवळीचे आधारस्तंभ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या प्रसंगी कृषी विभाग, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वजन व मापे कार्यालयामार्फत विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीरचे मेंढेवार, पुरवठा विभागाचे अव्वल कारकून मंजुर मुलतानी शेख, श्रीमती विद्या पवार, सर्व रास्त धान्य दुकानदार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.