
दै. चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
गेल्या ४०वर्षापासुन कांग्रेसचे एकनिष्ठ असे व ज्यांच्यामुळे जिल्ह्यात कांग्रेसचे अस्तित्व अंबाजोगाई च्या रुपाने टिकून राहिले असे राजकिशोरजी मोदी यांना वेळोवेळी पक्षाने डावलले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होवून शेवटी मोदींनी कांग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.
स्व. बाबुरावजी आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले.स्व.विलासरावजी देशमुख यांची त्यांच्यावर खास मर्जी होती आणी पापा मोदी ही या दोन्ही मातब्बरांच्या मर्जी ला खरे उतरले होते. अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात एकमेव अंबाजोगाई येथे कांग्रेस जिवंत ठेवण्याचे काम गेली ३० वर्षांपासुन केले आहे यात काही दुमत नाही.
परंतु जिल्ह्यातील काही मंडळींकडून सततच्या असहकारामुळे व सतत पक्षाकडून डावलले गेल्याने मोदी गटात असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांच्या सततच्या आग्रहामुळे व मागणीमुळे त्यांनी काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक न्याय मंत्री मा. ना. धनंजयजी मुंडे यांच्याशी त्यांचे असलेले सख्य पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. परंतु कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आगामी निर्णय घेतला जाईल असे मा. राजकिशोरजी (पापा) मोदी यांनी सांगितले.