
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी सय्यद सलमान
धाड सर्कल
देशातील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवर सलग तिसऱ्या वर्षी ही कोरोनामुळे पर्तिबंध लावण्यात आले. मात्र धार्मिक परंपरांना शासनाने परवानगी दिली असल्याने आज 17 मार्च सायंकाळी 5वाजता अतिशय साध्या पदतीने मात्र तेवड्यात उत्साहात एका टोपल्या मध्ये 11नारळ ठेऊन विधिवत होळी दहन करण्यात आले. मुजावर परिवाराने दर्ग्या जवळ त्यांच्या घरा समोर ही होळी दहन केले. यावेळी तहसीलदार रुपेश खंडारे., उपविभागी पोलीस अधिकारी, ठाणेदार, प्रशासन अधिकारी मुजावर कुटूंबीयातील सदस्य व मोजके अधिकारी उपस्तित होते.
जिल्हा भरातून व बाहर बाहर जिल्ह्यतून भाविक सैलानी बाबा चा दर्शना साठी येत होते. मात्र पोलीस प्रशासन ने सैलानी बाबा दर्गा पासुन 7/8किलोमीटर दूर भबिकांचे गाड्या अडकावल्या होत्या तरीपण भाविक 7/8किलोमीटर पायपीट करून सैलानी बाबाचे दर्शन साठी आलेच. देशातील सर्वात मोठी होळी म्हणून सैलानीतिल होळी प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षा पासुन लाखो नारळाची होळी ची परंपरा आहे. होळी जळत असताना भाविक अंगावरील कपडे नारळ निंबू बिबे खिळे बाहुली अंगावरून ओढावून टाकतात.
असे केल्याने जीवनातील दुःख कष्ट विध्न जळून जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र सतत तिसऱ्या वर्षी होळी टोपल्यात पेटविण्यात आली. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यात्रा महोत्सव दर वर्षी होळी पासून सूरु होते. या यात्रेला कर्नाटक, आंद्रपरदेश उत्तर परदेश, जम्मू कश्मीर तेलंगाना राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत असतात. मात्र कोरोना मुळे यात्रेस सलग तिसऱ्या वर्षी ही पर्तिबंद लावण्यात आले आहे. होळी च्या 5 दिवसा नंतर मुख्य संदल असतो ते यंदा 22मार्च रोजी पार पडणार आहे तेही साध्या पद्धतीने.