
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा दि १७ :- भारतीय लहुजी सेना सामाजिक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांकरीता तहसिल कार्यालयासमोर दि.१६ मार्च एक दिवसीय धरणे आंदोलन केले.लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शिफारशी मातंग समाजाला लागू करा,मातंग समाजातील मुलांना अस्वच्छ व्यवसाय या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते देण्यात येते तिचे मुक्ता साळवे शिष्यवृत्ती असे नामकरण करा,जीगांव प्रकल्पग्रस्त मातंग समाजातील मुलांना शासकीय नौकऱ्यात स्थान देण्यात यावे,मातंग समाजातील लोकांना प्रधानमंत्री व रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, नांदुरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना मुद्रा लोन उपलब्ध करून द्या.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजनेच्या विहिरींची प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे अधिकार गटविकास अधिकारी यांना देण्यात यावे इत्यादी मागण्यांकरीता धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देण्यात आले. ह्यावेळी लहुजी सेना जिल्हा अध्यक्ष, वामनराव बोरसे,गजानन पाटोळे, अशोक तायडे, प्रल्हाद कांबळे, महेंद्र वानखडे, बंडु म्हस्के, वासुदेव बोरसे, विजय सकळकर तसेच भारतीय लहुजी सेना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.