
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा दि.१७ :- मताचे मूल्य हे अनमोल आहे ते मूल्य सर्व सामान्य मतदारा पर्यंत पदाधिकाऱ्यानी पोहचविल्यास ” भिमाचा किल्ला ” मजबूत होईल असा दृढ विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते प्रा.डाॅ. राजकुमार सोनेकर यांनी केले. ते मामुलवाडी येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखा नामफलकाचे उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.आपणास मताचा अधिकार मीळाविण्यास किती लोकांनी बलिदान दिले त्यांचंही स्मरण करण्याची वेळ आता आली असेही ते म्हणाले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना नौकरी व शैक्षणिक आरक्षण संविधानात तरतूद करून दिले . त्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी अॅड. बाळासाहेब आंबेडकर एकटे लढत आहेत.हे आरक्षण कायम राहण्यासाठी व ओबीसीचे गेलेले राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करून अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा असे कळकळीचे आव्हान अॅड .अनिल इखारे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी यांनी केले.ह्या वेळी विशाखा सावंग,संतोष गवई,गणेश वानखडे, आतीष खराटे, विलास तीतरे यांनीही मार्गदर्शन केले.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर तायडे,तालुका महासचिव यांनी तर आभार प्रदर्शन भगवान इंगळे यांनी केले.ह्यावेळी विचारपिठावर, अॅड. सदानंद ब्राह्मणे, श्रीकृष्ण इंगळे, दादाराव अंभोरे,प्रविण विरघट, रमेश ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मपाल वाघोदे ,योगेश वाघोदे, अमोल वाघोदे, सिद्धार्थ वाघोदे, भागवत धनके, राजकुमार सोगाग्रे,अक्षय चिंचोळकर, एस.एम.पाटील, सतीश वाघोदे, आकाश वाघोदे, चंद्रभान वाघोदे यांनी परीश्रम घेतले.