
दैनिक चालु वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पंढरपूर :- खर्डी तालुका पंढरपूर येथील किरण गुजले, अक्षय पाटील, अजय मंडले हे तिघे जवळा येथे मसोबा दर्शन करून सांगोलकडे येत असताना सोनंद जवळ कंटेनर M.H.46 AF 1086 आणि बुलेट M.H.13 BT 4936 ची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला. दोघे जण हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले.
त्यातील किरण गुजले यांचे लग्न झाले होते त्यांच्या पाश्चात पत्नी, आई, वडील आहेत. अजय मंडले व अक्षय मलमे यांचं लग्न जमले होते. अजय मंडले हा आपल्या आजोळी आजोबां जवळ राहत होता. तिघेही जिवलग मित्र होते. घरची सर्वसाधारण परिस्थिती आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.