
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- व्यसनातून मूक्त होणं म्हणजे कौटूंबीक उत्पन्न वाढीला कौटूंबीक आनंदाला आणि आरोग्याच्या निरोगीपणाला मोठा आधार आहे याच विचारातून व्यसनमुक्त झालेल्या युवकांचा सत्कार श्री चौंडेश्वरी पौर्णिमेनिमित केल्याचं समाधान तालुका वनीकरण अधिकारी बी व्ही सदानंदे यांनी व्यक्त केले. शनिवार दि १८ मार्च २०२२ रोजी श्री चौंडेश्वरी देवी मंदिरामध्ये मासिक पोर्णिमेच्या निमित्त(१२वर्ष) शुक्रवार रोजी झालेल्या कार्यक्रमात समाजतील व्यसनमूकत होवून व्यवसायात मोठा जम बसवलेल्य युवकांचा सत्कार केला.सत्कारार्थमध्ये राम होळकर,सतिश दिवटे,मनोज बागडे ,जनार्दन आलगट, संतोष खामकर यांचा समावेश आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सदानंदे बी व्ही तालुका वनीकरण अधिकारी,उदयोजक अंबादास वरवडे ,सधन शेतकरी प्रकाश बागडे,सेवा निवृत्त प्रशासन अधिकारी मोतिलाल आसलकर पत्रकार शंकर खामकर,माजी नगरसेवक सोपान वरवडे,आणि सर्व समाज बांधव ,माता-भगिनी यांची प्रमुख उपस्थितीत होती. तपपूर्तीचा आणि आदर्श कार्यकर्त्यांचा सहकुटुंब सत्काराचा कार्यक्रम उत्साहात, आनंदात पार पडला, या कार्यक्रमासाठी माता भगिनीं ,सर्व कार्यकर्ते समाज बांधव यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करून उपस्थिती दिली.कार्यकृमाचे सुत्रसंचलन शंकर खामकर यांनी केले तर आभार विठ्ठल बागडे यांनी मानले.