
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- नांदेड दक्षिण मतदार संघात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार ४३.५८ कोटी रुपयांची रस्त्याचे व पुलाचे कामे मंजूर करून कामांचा शुभारंभ करण्यात आला असुन हे रस्त्यांचे व पुलांचे कामे अतिशय दर्जेदार व आधुनिक पध्दतीने करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले आहे. नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून नांदेड दक्षिण मतदार संघात ४३.५८कोटी रुपयांचे विविध विकास कामे मंजूर करण्यात आले आहेत.
नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण मतदार संघातील लोहा तालुक्यातील अनेक गावात विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आज दि.20 मार्च 2022 रोजी केला आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य तथा पं.स सदस्य श्रीनिवास मोरे पं.स सदस्य कैलास जाकापुरे, शेवडीचे सरपंच कैलास धोंडे, काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे महासचिव मधुकर पाटील दिघे , दयानंद येवले, सुदर्शन शेंबाळे पोलीस निरीक्षण भोसले कनमवार आदि उपस्थित होते.
यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी दगडगाव – सोनखेड रस्त्याचे ,सी सी करण व डांबरीकरणाचे__५.४०कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन केले. तसेच वाहेगाव दगडगाव सोनखेड रस्त्यावरील लहान पुलाच्या बांधकामाच्या २.५० कोटी रुपयाच्या भूमिपूजन केले.
तसेच शेवडी_पेनुर रस्त्यावरील मोठ्या फुलाचे ४कोटीचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे त्यांचे लोकार्पण केले तसेच वाहेगाव दगडगाव सोनखेड रस्त्याचे डांबरीकरण्याचे४.८० कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन केले तसेच नांदेड दक्षिण मधील भणगी व कपिलेश्वर गोशाळा रस्त्याचे सी. सी.करण व डांबरी करण्याचे १० कोटी रुपये कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की, नांदेड दक्षिण मतदार संघात आज जे ४३.५८कोटी चे रस्त्याचे कामे चालू झाले आहेत ते आधुनिक पध्दतीने अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होणार आहेत. यावेळी रस्त्याच्या कामाची गॅरंटी ५ वर्षांची असुन त्याचा टिकण्याचा कालावधी २० वर्ष असून या रस्त्यावरून ४० टनाची गाडी गेली तरी तो खराब होणार नाही असे आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी सांगितले व नांदेड दक्षिण मध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल मी नांदेड दक्षिण मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानतो असे ही आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.