दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :- कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, कृषी कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने “शास्त्रोक्त पद्धतीने मधुमक्षिका पालन” या विषयावर दिनांक २१ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत सात दिवसीय ऑनलाइन व ऑफलाइन मोफत निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात शेतकरी, ग्रामीण युवक-युवती, महिला शेतकरी तसेच विस्तार कार्यकर्ते सहभागी होऊ शकतात. शेती आधारित पूरक व्यवसाय तसेच उद्योजक निर्माण करणे हे ह्या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. तरी प्रशिक्षणासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी यात सहभागी व्हावे. प्रथम २५ नाव नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्राधान्य दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान विविध तज्ञ ऑनलाईन तसेच ऑफलाईन मार्गदर्शन करणार आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान शैक्षणिक सहलीचे आयोजन हनी बी पार्क, पिंपळगाव बसवंत येथे करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील मोबाईल क्रमांक ९४०३६३२४९० यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी /ग्रामीण युवक-युवती यांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले आहे.