दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मंठा :- दि.१९ मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहा आवती भवती घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसुन आले. बाटल्या व घाण उघड्यावर पडलेल्या होत्या. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच दुर्लक्ष असल्याने असे प्रकार घडत आहे.विश्रामगृहात अशा गंभीर घटना घडत असतील व वरीष्ट अधिकारी याला पाठिंबा देत असतील तर कर्मचारी दुर्लक्ष करीत असतील तर या कर्मचारी यांची अरेरावी वाढलेली दिसून येते. याकडे संबंधित अधिकार यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
या ठिकाणाचा वापर शासकीय कर्मचारी यांना होण्याऐवजी सदरील ठिकाणाचा वापर खाजगी व्यक्ती यांचा नेहमी या ठिकाणी वावर असल्याचे दिसून येत आहे. तरी या रस्त्यावर ये-जा करणारे लोक आर्थिक देवाण-घेवाण करून नोंद न करता वापर करतात. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी थांबायचे झाले तरी थांबता येत नाही. तसेच सदरील परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य झालेले आहे.तरी शासकीय विश्रामगृहावर नियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे का दुसरे कोणाचे हे कळेना?
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सदरील प्रकाराची चौकशी करण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच विश्रामगृहाचे कर्मचारी तेथे उपस्थित नसल्यामुळे सदरील ठिकाणी असलेले व्यक्तीला चौकशी केली असता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तरी वरिष्ठ विभागाने सदरील प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.