
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
महाळुंगी (नांदुरा)दि.२१ :- महाळुंगी येथे २० मार्च रोजी संगीत खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त पत्रकार शिवाजी चिमकर यांचा गुलाबराव महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला . महाळुंगी येथील शास्त्रीय भजन गायक स्वर्गीय सुभाष विश्वनाथ झोळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व भजनी मंडळींनी आपला सहभाग नोंदवला. तसेच प्रत्येक भजनी मंडळाला 25 मी. वेळ देण्यात आले.
प्रत्येकी भजनी मंडळास पाच भजन गाण्याची संमती होती. स्पर्धेत सहभागी भजनी मंडळास प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून संस्कार मूर्ती आचार्य हरिभाऊ वेरुळकर होते .तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री गुलाबराव महाराज उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक समाज भूषण विजय पारेकर यांनी केले होते. यावेळी जलमित्र रामकृष्ण पाटील, दिलीप धोरण, रवी खंडारे, पत्रकार शिवाजी ची मकर, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.