
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.२१.सम्राटअशोकाने आपल्या राज्यात प्राण्यांची शिकार बंद केली त्यावेळी राजे महाराजे आपल्या छंद जोपासण्यासाठी वन्य जीवांची शिकार करायचे अशोकाने त्यावर बंदी घातली त्याचा फायदा असा झाला कि वन्य प्राणी वाढले जंगले वाढली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ लागला जेव्हा समतोल असतो तेव्हा निसर्ग हि कधी उत्पाद माजवत नाही तो शांत च असतो अशोकाच्या राज्यात झाडांची लागवड करणे जनतेला ससक्ती चे होते शिवाय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून राज व्यवस्थे कडूनच च शेतमालाला हमीभाव दिला जायचा त्यामुळे शेतकरी अधिकाधिक शेती पिकवू लागला होता आणि बघता बघता शेतकरी सधन झाला हि अशोकाची रणनीती आज शासन स्वीकारेल तर भारताचा शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही.
या देशातील जनतेला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू ह्या बहुतांश शेती विषयकच आहेत शेतकऱ्याला अधिकाधिक धान्य पिकवून सरकार ने शेतकर्या कडून खरेदी केले व तेच धान्य परत जनतेमध्ये रास्त दरामध्ये दिल्यास शेतकरी सदन होऊ शकतील. हे सम्राट अशोक कितीतरी वर्ष अगोदर त्यांच्या राज्यामध्ये केलं होतं. आज त्याचं इम्प्लिमेंट होणे गरजेचे आहे. सरकार कसे असावे यासाठी सम्राट अशोक अवश्य समजून घेणे आवश्यक आहे. शेतकरी व व्यापारी यांना कर प्रणाली मध्ये काही कर म्हणजे टॅक्स लावले होते ते सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच होते की आणि कोणाला ते देण्यास कधी कमी पडत नव्हती कारण त्यांच्या शेतमालाला डायरेक्ट अशोकाचा शासन यंत्रणेतूनच हमीभाव मिळत होता त्यामुळे कराच्या रूपात राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात येत असे शिवाय अशोक केवळ याच एका उत्पन्नावर राज्य चालवत नसे.
तर शेतकर्या कडून घेतलेला शेतीचा माल दुसऱ्या राज्यात व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जाई त्यामुळे शासनाच्या तिजोरीत उत्पन्न वाढलेलं असते. अशोकाने शेतकऱ्यांकडून मिळालेला महसूल असेल किंवा व्यापाऱ्यांकडून मिळालेला महसूल हा लगेच वापरात आणला नाही त्याची साठवण केली आहे अर्थात आज आपण शेयर मार्केट वापरतो अशोकाने ते त्याकाळी वापरले आहे व्यापारासाठी आलेल्या वस्तूंचे जास्त किंमतीत विक्री करणे व कमी किमतीत वस्तू खरेदी करणे हे अशोकाचे वापरलेले दोन हजार वर्षापूर्वीचे तंत्र आहे आज आम्ही शेयर बाजारात वापरतो. यापेक्षा नुकसान भरपाई शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यापाराला नुकसान झाले असेल तर शासन व्यवस्थेतून त्याला नुकसान भरपाई दिली जायची.
आज आम्ही त्यालाच विमा म्हणजे अशोकाने दोन हजार वर्षांपुर्वी या साऱ्या सो यी आपल्या जनतेसाठी अमलात आणलाय आहेत लोकांना त्यांच्या जीवनाची हमी देणारा जगातला पहिला सम्राट अशोक आहे. आज आम्ही जीवनविमा काढतो पण पण तो हि वेळेवर मिळत नाही अशोकाच्या राज्यात जनतेच्या जीवनाची हि काळजी घेतलाय जात होती सम्राट अशोकाचे राज्य परिपूर्ण यासाठीच आहे कारण त्याने निर्माण केलेलं प्रशासन जे आजच्या घडीला आपल्या भारतात नाही. आजच्या युगात सम्राट अशोकाच्या राज्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणूनच बाबासाहेब यांनी घटनेत दिलेले अधिकार आज आम्हाला समजणे महत्वाचे आहे. सम्राट अशोक आपल्या जनतेला त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कधी हि तत्पर असायचा त्याच्या राजमहालाबाहेर असणाऱ्या घंटेचा नाद होताच अशोक बाहेर येत असे.
आपल्या जनतेची तक्रार ऐकत असे व काही क्षणात त्यावर निर्णय घेऊन त्या व्यक्तीची तक्रार निवारण करत असे आणि महत्वाचे अशोकाकडे कधी अशी तक्रार आल्याची नोंदणी च नाही कि पाणी नाही रस्ते नाहीत दिवाबत्ती ची सोया नाही अश्या मूलभूत गोष्टी अशोकाने वेळीच पूर्ण केलेल्या असत त्यामुळे जनतेला कधी त्यासाठी राजाकडे तक्रार करावीच लागत नसे अजून एक महत्वाचे गोष्ट आज आपण कंप्लेंट बॉक्स ची यंत्रणा पाहतो म्हणजे सरकार मध्ये तक्रार विभाग असतो अशोकाच्या राज्यात तो थेट अशोकाच्या नेतृत्वाखाली होती अखिल भारताच्या राज्याचे तक्रार निवारण स्वतः चक्रवर्ती सम्राट अशोक करत होते. विचार करा काय नियोजन असेल त्यांचं यालाच मॅनेजमेंट म्हणतात. सम्राट अशोकाला आम्ही बरेच संकुचित करून ठेवल आहे.
खऱ्या अर्थाने अशोकाचा राज्यकारभार जगासमोर आला पाहिजे. परंतु बऱ्याच लोकांनी त्यावर प्रकाश टाकला नाही असे खेदाने म्हणावे लागेल. अशोक ने शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली आहे. सम्राट अशोक यांच धर्माविषयी कार्य पाहू . सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आपले धम्म दूत इतर देशांमध्ये पाठवले. सोबत प्रत्येक राज्यांना आपल्या मैत्रीचा संदेश पाठवला ज्या राजांनी अशोकाचा संदेश वाचला ते सुद्धा बौद्ध धर्माकडे वळाले. जगात पहिला विश्वधर्म म्हणून बौद्ध धर्म ओळखला गेला. सम्राट अशोका मुळे . बुद्धांच्या अस्थी एकत्र करून सम्राट अशोकाने 84000 हजार स्तूप बांधले. याचा एक महत्वाचा भाग म्हणजे अशोकाने बांधकाम करवून घेतलेलं स्तूप हजारो वर्षांनंतर हि बऱ्या पैकी आज उभे आहेत हे त्याच्या बांधकाम कौशल्यांचे प्रतीक आहे.
परदेशी शासकांनी जर का नासधूस केली नसती तर आज जगाला भारताचा तो ऐतिहासिक ठेवा पाहता आला असता तरी देखील आज आपण पाहतोच आहे अशोकाकडून अनेक राजांनी प्रेरणा घेऊन नंतर लेण्यांची निर्मिती होऊ लागली आहे. महाराष्ट्र तर अशोकाची प्रांतिक राजधानी होती व सातवाहन राजे अशोकाचे मांडलिक राजे होते त्यामुळे महाराष्ट्र बौद्धमय होता आणि त्याचाच प्रभाव हा कायम प्रत्येक राजवटीवर आपणास पाहायला मिळतो.
प्रत्येक राजाने नेहमीच बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी काम केला आहे अगदी वैदिक राजांच्या काळात देखील लेण्यांचे काम थांबले नाही कारण जनता बौद्ध धम्मीय होती आणि त्यांनी आपल्या दानातूनलेणी उभारली हा अशोकाचा सर्वात मोठा विजय आहे भले अशोकाच्या काळात महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती नसली तरी पुढे निर्माण झालेल्या लेण्या ह्या अशोकाच्या बौद्ध धम्माच्या प्रसारामुळेच तयार झाल्या आहेत.