
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना प्रहार विद्यार्थी संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष आकाश खारोडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोना महामारी काळात प्रत्येक विद्यापीठाचे अभ्यासक्रम तसेच परीक्षा ही ऑनलाइन स्वरुपात घेण्यात आली होती.तसेच वर्ष २०२१-२२ मध्ये सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन-ऑफलाईन स्वरुपात झाले मात्र विद्यार्थांच्या विनंती अर्जांने अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे होणार्या उन्हाळी वार्षिक परीक्षा ही इतर परीक्षा केंद्रावर न घेता स्थानिक स्तरावरील विद्यालयातच घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या परिस्थितीत अमरावती येथे परीक्षा केंद्र ठरले असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी भाड्याने खोली करून,येजा करण्यासाठी बस उपलब्ध नसणे,खाण्याचे यांसारखे नाहक त्रास सहन करावे लागेल ज्याने विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक असे बहुतांश अडचणींचा सामना करावे लागेल.अशा परिस्थितीत अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देने अपेक्षित नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.ज्याप्रकारे १२ वी च्या परीक्षा ह्या आपल्याच स्थानिक विद्यालयीन स्तरावर सुरू आहे त्याच पद्धतीने ही सुद्धा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.लवकरात लवकर आपण विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा,अन्यथा प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.