
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- ऑस्ट्रेलियचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वॉर्नवर सेंट किल्दा फुटबॉल कल्बमध्ये अंत्य संस्कार पार पडले. यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राही उपस्थित होता. मॅकग्रासह अॅलन बॉर्डर, मार्क वॉ, मार्क टेलर यासह ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू आपल्य सहकारी मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजर राहिले होते. ग्लेन मॅकग्रा चा यावेळेस भावनांचा बांध फुटला. मॅकग्रा ला अश्रू अनावर झाले.
अनेक वर्ष आपल्यासोबत एकत्र खेळलेला ड्रेसिंग रुम शेअर केलेला आपला मित्र कायमचा निघून गेल्याने मॅक्रगाला भरुन आलं. हे दोघे क्रिकेटशिवाय जिगरी मित्रही होते. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंशिवाय इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनही उपस्थित होता. वॉर्न वॉर्न हे दोघे कट्टप प्रतिस्पर्धी होते मात्र फक्त मैदानात सामन्यादरम्यान. मैदानाबाहेर हे दोघे जीवाभावाचे मित्र होते.