
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- (जागतीक मानवी हक्क फाउंडेशन नवी दिल्ली यांचे कडून राष्ट्रीय समाज सेवा रत्न सन 2022 ह्या पुरस्काराने जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हाळनोर सन्मानीत) औरंगाबादकर शहरातील रहिवाशी श्री संजय हाळनोर यांच्या संकल्पनेतुन पाच वर्षा पूर्वी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेची निर्मित झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे स्वतः ड्राइवर होते. ते ड्राइवर आसतांना बाहेरगावी जर आपघात झाला किंवा गाड़ी ब्रेक डाउन झाली तर ड्राइवरला आणि प्रवासातील प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आसे व त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान देखील होत असे.
मणतात ना की गरज हि शोधाची जननी आहे. त्याच म्हणी प्रमाणे श्री संजय हाळनोर यांनी व्हाटसअपचा योग्य प्रकारे व चांगल्या कामासाठी वापर आपण करू शकतो. या विचाराने प्रवासात प्रवाश्यांना व चालक वर्गाला येणाऱ्या अडचणी बाबत फेसबुकवर लिखान चालू केले. वाहन चालवत आसतांना साप जरी आडवा आला तर वाहन चालक सापाला पण वाचवण्याचे कशोशिने प्रयत्न करतो. तो माणसाला का मारेल.करीता आपघात समयी ड्राइवरला मारहाण करू नका.पब्लीक कडून ड्राइवरला मारहाण होते मणुन त्या भितीने ड्राइवर पळून जातात व दुसरे वाहन चालक जखमी व्यक्तिला गाडीत घेत नाही.परिणामी वेळेवर उपचार न मीळाल्या मुळे न मरणारा व्यक्ति मरतो.
जर आपण आपघात समयी ड्राइवरला मारहाण न करता जखमी व्यक्तीस त्याच्याच गाडी मधे टाकून जर एंबुलेंसला फोन केला तर अर्धे अंतर अंबुलेस कमी करेल व अर्धे अंतर हा ड्राइवर कमी करेल.जेणे करूण जखमीला वेळेवर उपचार मीळतील व मरणारा व्यक्ति मरणार नाहि. हि हाळनोर यांची फेसबुक पोस्ट पाच वर्षा पूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.अनेकांनी त्या पोस्टचे कौतुक केले.तेव्हा कमेंट व लाइक करणार्या व्यक्तिंच्या प्रोफाइल वरूण त्यांचे मोबाइल नंबर हाळनोर यांनी मीळवले व त्यांचे वेगवेगळ्या शहराचे व्हाटसअप ग्रुप बनवले आणि त्या सर्वांचा एक पदाधिकारी ग्रुप बनवून नंतर जिल्ह्याचे, विभागाचे तसेच वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे ग्रुप हाळनोर यांनी बनवले .
त्यांच्या सहकारी सदस्य व पदाधिकार्यांनी गाओ गावीच्या पार्किंग मधे श्री संजय हाळनोर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला.संस्थेला जोडले गेलेले सदस्य गरजू व्यक्तिंना दिवस असो की रात्र थेट मदती करूण प्रवासातील प्रवाशांचा तसेच वाहन धारकांचा वेळ व पैसा वाचवू लागले.परीणाम स्वरूप अवघ्या पाच वर्षात संस्थेचे जाळे भारत देशातील प्रत्येक तालुका, जिल्ह्यात विणले गेले.आज घडीला (नेपाळ) काठमांडूसह देशातील प्रत्येक धार्मिक व पर्यटक स्थळी संस्थेचे सदस्य निस्वार्थ मदती करतात. संस्थेचे सदस्य मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतात.पूर ग्रस्तांना मदती करतात.अनेक वेळा तर एंबुलेंसच्या अगोदर संस्थेचे सदस्य आपघात स्थळी पोहचतात व आपघात ग्रस्तांना मदत करतात.
कोरोनाच्या काळा मधे सर्व देश बंद आसतांना.अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने मात्र चालू होती. तेव्हा अत्यावश्यक सेवेतील वाहन जर नादुरूस्त झाले तर त्या वाहनाला ताबडतोब दुरूस्त करूण पुढिल प्रवासास रवाना करण्याचे काम ह्याच जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने अहोरात्र केले. संस्थेला सलंग्न आसणार्या वाहन चालकांचा गभीर आपघात झाला किंवा दूर्दैवी अंत झाला तर संस्थेचे सर्व सदस्य फुल ना फुलाचा पाकळी देऊन आर्थिक मदती पण करतात. नुकेतच अहमदनगर येथील गिर्यारोहक अनिल वाघ हे मनमाड जवळील डोंगरकड्या वरूण घसरूण त्यांचा दूर्दैवी अंत झाला.
त्यांच्या परिवारास वाहन चालक बांधवांकडून 16529 रूपये जमा करूण अहमदनगर येथील कपिल सहानी यांच्या करवी वाघ कुटूंबियास देण्यात आले. आशा मदती मुळे जय संघर्ष संस्था अल्पावधित नावा रूपास आली.त्या अनुषंघाने संस्थेस महाराष्ट्र राज्यातून आता पर्यंत 17 पुरस्काराने पुरस्कारीत आलेले आहे.
बीड येथून महाराजे यशवंतराव होळकर राज्य स्तरीय पुरस्कार 2021 संस्थेस जाहिर झालेला आहे.