
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- गोर सिकवाडी व गोर सेना च्या वतीने २६ मार्च रोजी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय गोर बंजारा वधू-वर परिचय मेळाव्या चे आयोजन करण्यात आले आहे . या मेळाव्यात विवाह इच्छुक वधू -वर ,घटस्फोट ,विधवा-विधुर, अंध-अपंग महिला ,पुरुष सहभागी होऊ शकतात. या मेळाव्यासाठी नोंदणी सुरू असून त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन गोर सिकवाडी परभणी जिल्हा संयोजक प्रा.नारायण आडे यांनी केली आहे. २६ मार्च रोजी मराठवाडा महसूल प्रभोधिनी औरंगाबाद येथे हा वधू-वर परिचय मेळावा होणार आहे.
प्रथमच बंजारा समाजातील घटस्पोटित तसेच विधवा -विधुर महिला ,पुरुषांचा परिचय मेळावा होणार असून त्यासाठी पूर्व नोंदणी करणे अवश्यक आहे . या मेळाव्यास सहभागी वधू-वर परिचय समंधित पुस्तिका याचे पण प्रकाशन होणार आहे .यासाठी परभणी जिल्ह्या मधून ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी ९६२३९५९२६१ या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे अहवान करण्यात आले आहे.