
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- मौ.गुट्टेवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील आर्मी चे जवान अनिल जनार्दन गुट्टे (वय ४०) हे कलकत्ता येथील शासकीय रुग्णलयांमध्ये सोमवार दि -२१ रोजी दुपारी ३च्या सुमारास ह्द्यविकार चा अटॅक येऊन शहीद झाला.त्यांनी १९ वर्ष देशाची सेवा केली. अनिल गुट्टे यांचे पार्थिव उद्या सकाळी कलकत्ता येथून विमानाने येणार व त्यांचं अत्याविधी गुट्टेवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात आई,पत्नी,१ मुलगी व १ मुलगा असा त्यांचा परिवार आहे.