
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
काटाळवेढा ता. पारनेर :- सोमवार दि. २१ मार्च २०२२ शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा ११/२ असा विजय मिळवल्याने जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले,”काटाळवेढा सेवा सोसायटी चा निकाल ऐकल्यानंतर खूप आनंद झाला. मला तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून दिले पुढे महा विकास आघाडीचे सरकार झाल्यानंतर पक्षाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती मध्ये काम करण्याची संधी दिली. त्या संधीचा फायदा नक्कीच आपल्या तालुक्यासाठी होऊन तालुक्याला झुकते माप देऊन विकास कामे केली.
आपल्या काटाळवेढा गावात जवळपास गेल्या पाच वर्षांमध्ये एक कोटी पेक्षा जास्त रकमेची कामे मार्गी लावली. यामध्ये डोंगरवाडी येथील अंगणवाडी, शाळा खोली, डोंगरवाडी ते पळसपुर रस्ता, जिल्हाहद्द ते काटाळवेढा रस्ता, दत्त मंदिर रस्ता, आडवाट रस्ता सुधारणा करणे असे कामांचा समावेश असून यामुळे मतदारांमध्ये परिवर्तन होऊन सेवा सोसायटीमध्ये सत्ता आपल्याला मिळाली. नवनिर्वाचित संचालकांनी अभ्यास करून संस्थेच्या माध्यमातून सर्वच शेतकरी सभासदांना कर्ज उपलब्ध करून द्यावी, चांगले काम करा, सभासदांचा विश्वास संपादन करा आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.”
विजयी उमेदवारांना मिळालेली मते – कडूसकर ठकाशेठ -३५०, डोंगरे गीताबाई -३४८,डोंगरे रेखा – ३३२,गुंड सभाजी -३२५,गगे शरद – ३०९,डोंगरे अलका – ३०८,गाजरे रामदास -३११, डोंगरे अशोक – ३०४,खटाटे लक्ष्मीबाई -२९९, पुरी कैलास – ३०४,गाजरे बबन-३०० काटावेढा शेतकरी ग्राम विकास परिवर्तन पॅनल गटाचे ११ उमेदवार विजय होऊन विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेने एक हाती सत्ता मिळविली.
यावेळी दगडू शेठ कडुसकर,भाऊ कोकाटे, सोपान गजबा गुंड, बाळासाहेब गुंड, बाबाजी गाजरे, भाऊसाहेब लामखडे, बाबाजी नारायण गुंड, भाऊ गुंड, नाना डोंगरे, हरीश डोंगरे, देवराम डोंगरे, भाऊसाहेब डोंगरे ,लक्ष्मण गाजरे, लहू डोंगरे, बारकू कडुसकर,बबन नारायण गुंड, भास्कर डोंगरे, लक्ष्मण डोंगरे, लहू डोंगरे, गोपीनाथ गुंड, बारकू गाजरे, संभाजी गाजरे, बाळासाहेब सरोदे, भाऊ हरी गुंड, प्रकाश खटाटे, विकास गाजरे, बारकु गुंड, प्रमोद गाजरे, अंकुश गुंड, संभाजी डोंगरे, सुनील डोंगरे, दत्ता कोकाटे,बाबु गाजरे, नवनाथ लामखडे, शिवाजी डोंगरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पॅनल विजयी होण्यासाठी सुदाम शेठ गाजरे, शाखाप्रमुख सुनील आग्रे,युवा शाखाप्रमुख गणेश गाजरे यांचे विशेष सहकार्य मिळाले.