
दैनिक चालु वार्ता
घूग्घूस प्रतिनिधी
प्रदिप मडावी
घूग्घूस :- आज दिनांक 22 मार्च 2022 ला भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी द्वारा चालू असलेल्या चरणबध आंदोलन च्या तृतीय चरणात वणी क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय उर्जाग्राम ताडळी येथे , कोल कामगारांच्या मागण्या साठी एक द्विवसीय धरणा प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मा.सुधीरजी घुरडे (महामंत्री अखिल भारतीय खदान मजदूर संघ, सदस्य JBCCI 11 ) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना सांगितले की, वर्तमान CMPF घोटाळा संदर्भातील चौकशी आणि प्रबंधक कामगार विरोधी निती निर्णयाचा भारतीय मजदूर संघ पूर्ण ताकतीने विरोध करेल.
मा.कमलाकरजी पोटे (वेकोली कल्याण समिती सदस्य) द्वारा वणी क्षेत्राच्या उणीवा बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली.
आंदोलन कार्यक्रमाच्या महत्वाच्या टप्यात वणी क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालया समोर धरणा प्रदर्शन करण्यात आले एवढ्यावर प्रबंधन ने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी मा.महामंत्री भा.को.ख.म.संघ वणी-माजरी श्री-जगन्नाथजी जेणेकर द्वारा देण्यात आला. या आंदोलनाला सर्वच उपक्षेत्रीय पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे असे यावेळी मा.रहांगडले अध्यक्ष भा.को.ख.म.संघ.वणी-माजरी यांनी कळविले आहे. या धरणा प्रदर्शनात प्रामुख्याने भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.