
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कधी काळी निसर्गानं निर्माण झालेल्या पृथवीतलावर माणव निर्मिती झाली.आदिमानवा पासून चालत आलेली आणि महाभारत संपले,रामायण संपले. या कलीयुगातच थोर महात्म व्यक्तीनी जगात शांतता नांदावी म्हणून नाज्ञ विचार पेरत गेले.त्यातून ही युद्ध, लढाय्या होत गेल्या. गोर,गरीब,जनतेवर ,रयतेवर अन्याय, अत्याचाचर, होत असताना प्रत्येक छैट्या,मोठ्या प्रांतात, राज्यात, किंबुहूनां देशात महापुरुषांचा जन्म घेतला. त्या त्या प्ररिस्थीती नुसार राजेलोक लढले .जनतेला अन्यातून मुक्त कले.राज्य उभारले.स्वच्छ राज्य कारभार केला.त्यांच्या विचाराची नवी पिढी तयार होऊ लागली.
त्यांच्या बरोबर संत,साधू,धार्मिकता जपणारी माणसं निर्माण झाली. हळूहळू ज्ञानी माणसं विविध क्षेत्रात नवनवीन शोधयंत्र तयार करू लागली. कौशल्ये,दाखवू लागली. फार मोठा जगाचा विस्तार आहे.अनेक माणव निर्मित जाती,पाती,धर्म निर्माण झाले. लोकसंख्या वाढत गेल्या.तस लोकांच्या अन्न,वस्त्र, निवाराच्या गरजा लाढत आहेत.अनेक विद्धवान ,पंडीत,विचारवंत,शास्त्रांज्ञ यांच्या माध्यमातून अनेक देशात लोकशाही रूजली.काही देशात एकशाही,काही देशात हुकूमशाही रूजली. अंखड जागाचा एकचं भाग .त्यात पूर्वजांकडून लहान सान देश तयार झाले.
प्रत्येक देशाचे राहणीमानाचा, काम करण्याचा खाण्यापिण्याचा वेगवेगळा राहिला.निसर्गानं निमार्ण केलेल्या विविध वनस्पतींची प्रक्रिया झाली .त्यातून माणवांची भूक भागवण्याची साधन तयार झाली पशू,प्राणी पक्षी,त्या़चा उपयोग माणव आपल्या आयुष्यात करू लागले.माणसांच्या जगण्यात पुरेपूर वापर करू लागले. जगात पृथ्वीतलावर सोन्याच्या खाणी सापडल्या, तेलाच्या खाणी सापडल्या,अनेक मौल्यवान वस्तूंची खजिने सापडली.त्यामुळें जगातल्या अनेक देशांना त्याचा उपयोग होत आहे.त्यामुळे अनेक देश एकमेकावर अंवलंबून आहेत.
या धावपळीच्या युगात जे देश बलाढ्य आहेत ते बलाढ्यचं राहिले.प्रत्येक देशाने आपले आपले परीने जगात महासत्ता होणेसाठी प्रर्यंत्न केले. एकमेकांच्या अडीअडचणी, देवाण घेवाणमध्ये करार केले.यापुढे जावून आपलाच देश कसा महासत्ता बनेल यासाठी नव्या तंत्रानुसार साधनं तयार करत गेले.जगात अजून हि सिमावादांचे घोंगडे भिजत पडलेले आहेत.ते मात्र सामोपचाराने, सोडवण्याची कुणी कल्पना करत नाहीत पण हे सारं पुर्वजनांचं आहे.हे माझं माझं म्हणून आटापिटा करत आहेत आणि ते राखण्यासाठी अनेक देशांनी कदाचीत त्यातून आपणचं जगकर्ता होईल म्हणून किंवा संकटं काळी समाजाला जनतेला वाचवण्यासाठी, अनेक विध्वंस अशी साधणे,वहाणे तयार करून ठेवली आहेत.
पण प्रत्येका देशात एकमेकास विरोध करणारी माणस पण निर्माण झाली. अतिरेकी,दहशशदवादी,त्यांचा बिमोड करून आपल्या जनतेला संरक्षण देणं यासाठी वापर करू तर लागलेचं .परंतू या जगात अजून काही देश असे आहेत कि ते देश एकमेकाविरुद्ध लढत आहेत.एकमेकाशी लढता लढता शेजारच्या देशांची मदत घेत आहेत आणि यातून कदाचीत जगात महासत्ता देश बनायचे सोडून महायुद्धाच्या खाईत लोटले जाऊ शकतील यांचे भान ठेवायला हवे.
जगात लोकसंख्या वाढली.तशी महागाई वाढली.अनेक लोक कष्ट करुनही दोन वेळचं अन्न ,वस्त्र,निवारा मिळत नाही.
त्याच्याबद्दल देशकर्त्याकडून उपाययोजनांची अंमलबजाणी करायला हवी. जगातील प्रत्येक माणव निर्मिती होते ती एका मातेच्या पोटी.ज्यावेळी माणव जन्म होतो त्यावेळी त्या मातेला काय वेदना होतात त्याची जाणिव या युद्ध कर्त्याना असायला हवी. निसर्ग निर्मित माणव जातीला ,पशू,पक्षी,प्राणी यांना आपापल्या परीने जगू द्या. पूर्वजांकडून मिळालेली धन,दौलत,निसर्गातल्या तयार झालेल्या मौल्यवान वस्तूंची देवाणघेवाण ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणे वापर करून जगण्यास पर्याय असावा. आपण आपापल्या देशात आपण सारे भाई भाई नारा देत असतो.जग खूप सुंदर आहे.आनंदी जगण्याला वाव आहे.
प्रत्येक माणव जन्मला तसा मृत्यु पण पावणार आहे प्रत्येकांचे जगणे हे क्षणभंगूर आहे.रंक असेल,राजा असेल किंवा राव असेल.प्रत्येकाला हि पृथ्वीवरून माती आड जावं लागणार आहे मग एवढा आटापिटा कशासाठी करता.प्रत्येक माणव ज्याच्या त्याच्या कर्माने आपले जीवनमान संपवणार आहे.प्रत्येक देशातही निष्पाप जनता आहे.सुंदर जीवन जगत आहेत. काही फुटपाथ वर जगत आहेत. काय माहित त्यांना.राज्य कर्ते युद्ध कशासाठी करत आहेत.
जगाच्या पाठीवर निष्पाप जनतेला जगू द्या.जिथं पिकतयं तिथं विकू द्यावे.देशकर्यानी विचार करावा आपला हि जन्म क्षणभंगूर आहे .आपणही सुंदर जीवन जगू या.दुसऱ्यांनाही जगू द्या.युद्ध नको शांती निर्माण करूया.नैसर्गिकरीत्या निर्माण झालेला निसर्ग अबादीत ठेवूया.हिच करी तुमच्या बुद्धमतेची शान असेल.आणि देशातील प्रत्येक मानव जाती विषयी प्रेम आणि निष्ठा असेल.
कवी सरकार. इंगळी.
ता हातकणंगले.