
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- ग्रामीण रुग्णालय कंधार येथे 12 ते 14 वर्षे वयोगटातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवार दिनांक:-23 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय ,कंधार येथे गुलाब पुष्प देऊन मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिली कॉर्बीवॅक्स लस कामेश घनश्याम विश्वासराव (वय- 14) वर्षे श्री शिवाजी हायस्कूल कंधार या बालकास देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. आर. लोणीकर सर ,डॉ. महेश पोकले सर दंत शल्यचिकित्सक ग्रामीण रुग्णालय यांच्या उपस्थित 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
एम यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर. लोणीकर सर डॉ.महेश पोकले श्री.प्रशांत कुमठेकर, श्री.दिलीप कांबळे,निमिषा कांबळे, श्रीमती. अनिता तेलंगे ,ज्योती तेलंग ,ज्ञानेश्वरी गुट्टे, श्री.झोटींगे नरसिंग, कामेशचे वडील घनश्याम विश्वासराव व सर्व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . सन -01जानेवारी 2008 ते 15 मार्च 2010 पर्यंतचे जन्मलेली सर्व मुले मुली कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत.
मुलांच्या लसीकरणासाठी फक्त कॉर्बीवॅक्स लसीचा वापर करण्यात येत आहे. लसीकरणानंतर ताप येणे हात दुखणे अशी सोम्य लक्षणे आढळून येऊ शकतात. मात्र मुलांनी घाबरून जाऊ नये. डॉक्टरांनी दिलेल्या औषधी घ्यावेत. इतर काही त्रास जाणवल्यास ग्रामीण रुग्णालय संपर्क साधावा, असे आव्हान कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर सर यांनी केले आहे.