
दैनिक चालु वार्ता
भिगवन प्रतिनिधि
जुबेर शेख
भिगवन :- पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच ‘जल है तो जीवन है ‘ असे मानले जाते. आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते.पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजा पैकी एक म्हणजे पाणी.
सर्व सजीव शृंखला पाण्या भोवती गुंत आहे, पाणी नाही तर तिचा देखील काही उपयोग होऊ शकत नाही, म्हणून असे पाण्याचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी २२ मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक जल दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले आणि लगेच २२ मार्च १९९३ हा पहिला जागतिक जल दिन भारतात साजरा करण्यात आला. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जागरूक करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.
या जल दिनाच्या निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतीक भवन पुणे येथे रोटरी डिस्ट्रिक्ट 3131आयोजीत जलोत्सव 2022 या कार्यक्रमात भिगवण रोटरी क्लबने गटरमुक्त गाव व भिगवण परीसरातील गावांमध्ये केलेलें शोषखड्डे ची कामे, तसेच मदनवाडी येथे केलेले 4 किमी ओढा खोलीकरण, यासह महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेच्या मदतीने केलेल्या मदनवाडी जुने भिगवण, पोंधवडी, आदी ठिकाणी तलावातील गाळ काढण्याचे कार्य, तसेच पाण्यासाठी चे केलेले वेगवेगळे उपक्रम या साठी भिगवण रोटरी क्लब ला जलोत्सव 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ समाजसेवक हिवरे बाजार चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, जलतज्ञ सतीश खाडे यांच्या हस्ते भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे व संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांनी हा पुरस्कार स्वीकारला, भिगवण रोटरी क्लबचे सर्व माजी अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार मिळाला असल्याचे यावेळी बोलतांना संजय खाडे यांनी सांगितले, या कार्यक्रमात पाण्याविषयी, पर्यावरण विषयी, दुषीत झालेल्या नद्या व धरणे या साठी काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा ही सन्मान करण्यात आला.