
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- जुलै महिन्यात विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. आज विधान परिषदेत या सदस्यांचा निरोप समारंभ झाला. अजित पवार यांनी सभापती यांच्या बाबत परिचय सभागृहाला करून दिला. यावेळी अजित पवारांनी प्रसाद लाड यांच्या बाबत बोलताना, प्रसाद लाड यांचे लाड कुणी केले आणि त्यांनी प्रसाद कुणाला दिला हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
मनसे मधून आले आणि भाजपमध्ये इतके मोठे कसे झाले असा प्रश्न भाजप मधील इतर जेष्ठ नेत्यांना देखील पडला असेल, असही अजित पवार म्हणाले. वेगाने एखाद्याच्या जवळ जाण्याची कला प्रत्येकालाच जमत नसली तरी ती प्रविण दरेकरांनी इतर पक्षांना नाही तर किमान स्वपक्षीयांना तरी सांगावी अशी मिश्किल टीप्पणी पवार यांनी दरेकरांवर बोलताना केली.