दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिकांवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. या सदनिका सील केल्या असूनही त्याचे बाजारभावाने मुल्य सहा कोटी 45 लाख रुपये आहे. एकीकडे हे प्रकरण सुरू असताना मुंबई महानगरपालिकेने मोहित कंबोजला नोटीस दिली आहे. सांताक्रुझमधील कंबोज याच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय मनपाला आहे. त्यामुळे त्यावर कारवाई होणार आहे.
या कारवाईवरून मोहित कंबोज यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ट्विट केले आहे की,’उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही मी घाबरत नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा. माझं जे काही करायचं ते करा. खोट्या नोटिशी आणि केसेसे करायच्या असतील तर तेही करा, माझा महाविकास आघाडी विरोधातील संघर्ष सुरू राहणार,’ अस म्हणत कंबोज असं आव्हान देणारं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलं आहे.