
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पटना :- बिहार सरकारमध्ये पशुपालन मंत्री आणि विकासशील इंसान पक्षाचे संस्थापक मुकेश सहनी यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या ३ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजू सिंह, मिश्री लाल आणि सवर्णा सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी तिन्ही आमदारांना मान्य़ता दिली आहे. यावर मुकेश सहनी यांनी आपल्याला याबाबत अजून काहीही माहिती नसल्य़ाचं म्हटलं आहे.
VIP च्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मंत्री मुकेश सहनी एकटे पडले आहेत. याआधी बिहार NDA मधून ते आऊट झाले आहेत. काही दिवसांपासून त्यांचे भाजपसोबत मतभेद सुरु होते. उत्तर प्रदेशनंतर आता बिहारमध्येही भाजपशी मुकाबला करणे मुकेश सहनी यांना जड झाले आहे. मुकेश सहनी यांच्या पक्षाच्या तीन आमदारांनी आज पक्षांतर केल्याचं समोर य़ेत आहे. मुकेश साहनी यांच्या पक्षाचे बिहारमध्ये तीन आमदार आहेत.