
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री. रमेश राठोड
सावळी सदोबा :- आर्णी तालुक्यातील मौजा माळेगांव येथिल सुप्रसिद्ध गायक सुनिल चव्हाण यांनी पारवा पोलीस स्टेशन चे तत्कालीन ठाणेदार श्री.हनुमंतराव गायकवाड यांची कन्या डाॅ.हितेषी व डाॅ.संतोष यांचा साक्षगंध सोहळा नक्षत्र हाॅल नांदेड येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पाहूणे मंडळी च्या मनोरंजनासाठी संगीत रजनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माळेगांव ता. आर्णी येथील सुप्रसिद्ध गायक तथा सिनेकलावंत सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरूषाच्या आवाजात गायन करून पाहूणे मंडळींना अक्षरशा भारावून टाकले या सोहळ्यात यवतमाळ जि.प.चे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर .पत्रकार गोकुळ भवरे.अवि पाटील व बरेच पाहूणे मंडळी हजर होती