
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वानोळा सर्कल
अजय चव्हाण
किनवट :- दि.23 मार्च रोजी गोपीकिशन मंगल कार्यालय येथे पार पडला. सर्व मान्यवरांचा बंजारा पारंपरिक पद्धतीने डफडा लावून स्वागत करण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव व खासदार श्री.अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब,आमदार बालाजी कल्याणकर साहेब,जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे साहेब,प्रकाश मारावार, उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे,शिवसेनेचे विधानसभा संघटक सचिनभाऊ नाईक, किनवट तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे,माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सर्व प्रथम बाळासाहेब चौकात प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर सुदर्शन नाईक, सचिन नाईक, युवा समन्वयक यश खरा टे, व किनवट येथील पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात मन की बात प्रमाणे काम न करता सर्व सामान्या पर्यंत पोहोचून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. महायुती मधील काही मित्र पक्षांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेना अजून हिंदुत्व घेवून वाटचाल करते, हा मेळावा प्रचारासाठी नसून महाराष्ट्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
सर्व समस्या सोडविण्यासाठी उद्धव साहेब कटीबद्ध आहेत असे प्रतिपादन देसाई यांनी केले. सर्व शिवसैनिक यांनी कोरोणा काळात आपल्या जीवाचे बलिदान देऊन जनसेवा केली या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले. शिवसेना हा पक्ष नसून एक सामाजिक चळवळ आहे. परंतु जनसामान्याच्या कल्याणासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मा. तालुकाप्रमुख वेंकटअण्णा भंडारवार शहरप्रमुख सुरज सातूरवार मा.शरद जयस्वाल युवासेना जिल्हा समन्वयक यश खराटे,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे, आनंद तिरमनवार, निरधारी जाधव, उपसभापती उमेश जाधव, सभापती चिंतामण राठोड, पि. एम.चव्हाण,आजी माजी पदाधिकारी व विभाग प्रमुख शाखा प्रमुख, बूथ प्रमुख उपशाखा प्रमुख व सर्व शिवसैनिक, पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी सर्व धर्मीय 300 च्या जवळपास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना माहूर किनवट तालुका च्या वतीने कार्यक्रम पार पडला.