
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरत आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आमिरने काश्मीर फाइल्सवर केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. आमिरने सगळ्यांना काश्मीर फाइल्स पाहण्याचे आवाहन करत म्हणाला, काश्मिरी पंडितांसोबत जे घडले ते निश्चितच दुःखद आहे.
आमिरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चर्चा केली आहे. दरम्यान, अभिनेता कमाल आर खानने त्याच्या एका जुन्या विधानाबाबत ट्वीट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत केआरके म्हणाला, “आमिर खानने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले. त्यांची पत्नी म्हणाली होती की, देशात भीती वाटते. देश सोडून जाऊया. भाईने पत्नी सोडली, पण देश सोडला नाही.” केआरकेच्या या ट्वीटवर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी आमिरलाच ट्रोल केले आहेत.
पण, २०१५ मध्ये आमिरने देशातील असहिष्णुतेवरून मोदी सरकारवर वक्तव्यं केलं होतं. यावरून त्याची पत्नी किरण राव हिनेही त्याला देश सोडून जाऊया असे सुचविले होते. तर आमिर आणि किरणचा ३ जुलै २०२१ रोजी घटस्फोट झाला. तर आमिरचे हे दुसरे लग्न होते. लग्नाच्या १६ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते विभक्त झाले.