
दैनिक चालु वार्ता
सिडको प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
नांदेड :- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी व खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे. नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस पक्ष वाढीसाठी व मा. ना. अशोकराव चव्हाण यांचे विचार व कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचे बुलंद तोफ म्हणून परिचित असलेले महाराष्ट्र विधानपरिषद प्रतोद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांची महाराष्ट्र विधानपरिषद काँग्रेस पक्ष गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल सिडको वगळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने सिडको ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांच्या नेतृत्व खाली आज दि.२४.०३.२२ रोजी सकाळी ठीक ११:३० वा.सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड सिडको येथे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष विजय येवनकर व नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष प्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक कांग्रेस कमिटी पक्ष प्रभारी संतोष पांडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजीने ढोल ताशाच्या गजरात पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तदनंतर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष विजय येवनकर व पक्ष प्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी पक्ष प्रभारी ॲड संतोष पांडागळे सिडको ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांच्या हस्ते फटाक्यांची आतिषबाजी व नागरिकांना पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
या वेळी माजी जि. प. सदस्य आनंद गुंडले, माजी नगरसेविका प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे, प्रा.अशोक मोरे,डॉ. नरेश रायेवार, डॉ. बाबुराव ढगे, राजू लांडगे, शेख लतिफ,आहात खान पठाण,शेख नूरुद्दीन, देवीदास कदम, विश्वनाथ शिंदे, भि. ना. गायकवाड, निवृती कांबळे, नारायण कोलंबीकर,किशनराव रावणगावकर, देवीदास कदम, प्रा डॉ रमेश नांदेडकर,संजय कदम, संतोष बारसे, प्रा. गजानन मोरे,काशिनाथ गरड, रामराव जावरे, पंढरीनाथ मोटरगे, के.एल. ढाकणीकर,नामदेव पदमने, माणिक श्रोते,संतोष कांचनगिरे, वैजनाथ माने, गणेश खंदारे, भगवान जोगदंड, ॲड.संदिप गायकवाड,अक्षय मूपडे, प्रकाश वानखेडे, दत्तराम कोकणे, प्रभू उरुडवड, संदिप कदम, संगम कांचनगिरे, सायलू अडबलवार, प्रा.शशीकांत हाटकर,श्रीमती विजया काचावार, श्रीमती सुभद्रा कदम, श्रीमती पार्वती कोरडे, सौ.विमल ताई चित्ते सौ. अनिता गज्जेवार, सौ. ज्योती कदम, सौ. संतोषी भाले, सौ.बारसे,शेख मॅडम, सौ.गायकवाड, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.