
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- चीनमध्ये यंदाा ब्रिक्स संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला मोदी उपस्थित राहू शकतात. गेल्या दोन वर्षांपासून संबंध ताणलेले असल्याने दोन्ही देशांचे नेते एकमेकांकडे गेले नव्हते. आता वांग यी भारतात येत असल्याने चीनने जयशंकर यांच्या दौऱ्याचे मार्ग मोकळे केले आहेत. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास उद्याच्या भेटीने मदत मिळणार आहे. वांग यांच्या दौऱ्यानंतर सारे काही ठीक झाले तर मोदी देखील ब्रिक्स शिखर परिषदेला जातील.
याचबरोबर तिथे रशिया-चीन आणि भारत यांच्यादरम्यान मोठी बैठक आयोजित होण्याची शक्यता आहे. वांग यी हे सध्या पाकिस्तानात आहेत. तिथे इस्लामिक देशांच्या संघटनेची इस्लामिक सहयोग संघटना ओआयसीची बैठक सुरु आहे. चीन जरी सदस्य नसला तरी पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. वांग यी भारतात येणार का याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतू जर ते आले तर २०१९ नंतर पहिलीच भेट असणार आहे.