
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- आमच्या सरकारने मुंबईचा विचार केला याचा मला अभिमान वाटतो. मला शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून अभिमान वाटत असल्याचं उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सभगृहात महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन केले. आजोबा नारळाचे झाडं लावतात, पण त्याचं फळ कोण खातात हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार केला पण त्याचा फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून केला, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वसामान्यांना घरं, तसेच आमदारांना घरं देण्याची घोषणा केलीये. बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीवासीयांना मोफत घर मिळायला हवी म्हणून SRA आणले. पण त्याची गती कासवापेक्षा कमी राहिली, फळं लागतात पण मलई कोण खाते संशोधनाचा विषय? ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी योजना आणली आहे, यासाठी तीनही मंत्र्यांचे अभिनंदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना घरं मिळालीच पाहिजेत.
या सरकारने विचार फक्त कादावर केली नाही तर ती सत्यात उतरवली आहे. धारावीचा विकास केंद्राच्या धोरणामुळे रखडला असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सफाई कामगारांचा विचारही या धोरणात केला आहे. आता घोषणा झाल्या आहेत आता कामाला लागणार आहे. बीडीडी चाळीचा विकास आता सुरु झालायं. आमदारांनाही आता मुंबईत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले.