
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रविण दरेकरांची मिश्किल खिल्ली उडवली आहे. साखर कारखाने, सहकारी बॅंकेच्या मुद्यावर विधानपरिषदेचे भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी खोचक टीका केली होती. यावर अजित पवार यांनी दरेकरांची फिरकी घेतली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सभागृहात महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. साखर कारखान्यांच्या विक्रीतही भ्रष्टाचार झाल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.
साखर कारखान्यांच्या विक्रीतही भ्रष्टाचार झाल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. दरेकर यांच्या दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या गुन्ह्याचा उल्लेख न करता यावेळी अजित पवार म्हणाले, यापूर्वी नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांना काम करताना पाहिले आहे. मात्र दरेकरांच्या संतापाच कारण समजल नाही. ‘त्यालाही काही कारणं असू शकतात. ती त्यांनाच माहिती आहे’ असेही अजित पवार म्हणाले.