
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- धनंजय मुंडे यांनी सहा मुलं आणि बायका लपवल्या आहेत असा खळबळजनक आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. करूणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर निवडणुकीत विजय आपलाच होईल असा विश्वासही व्यक्त केला.
नेमकं काय म्हणाल्या आहेत करूणा शर्मा?
”धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अनेक बायका आणि सहा मुलं लपवली आहेत. त्यामुळे आता त्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत.” असा इशाराही करूणा शर्मा यांनी दिला आहे. करूणा शर्मा आणि माझे परस्पर सहमतीने संबंध होते हे धनंजय मुंडे यांनी मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातच मान्य केलं आहे. तसंच त्यांच्या मुलांना आपण नाव देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र करूणा शर्मा यांच्याशी विवाह केल्याची माहिती दिलेली नाही. आता करूणा शर्मा या कोल्हापूरमधून पहिली पोट निवडणूक लढवत आहेत.