
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता. प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- दि: २९ मार्च २०२२ रोजी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग लातूर व राधिका ट्रॅव्हल्स लातूर व माझं लातूर परिवार तसेच जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने सर्व पत्रकार बंधूंना हेल्मेट वितरण सोहळा येत्या 29 मार्च 2022 रोजी सायंकाळी6:00 यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स अशोक हॉटेल लातूर या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल पिंगळे सर पोलीस अधीक्षक लातूर कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन नेरपागर प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्रादेशिक उपविभागीय परिवहन अधिकारी विजय भोये सर श्याम तोष्णीवाल व राजेश जाधव तसेच अरुण समुद्रे अभय मिरजकर आदित्य शेठ भुतडा सुनील देशपांडे महेंद्र पारडे जगदीश स्वामी या कार्यक्रमाचे आयोजक नितिन बनसोडे बबलू तोष्णीवाल योगेश शिंदे (जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था लक्झरी बसेस प्रदेशाध्यक्ष)सोमनाथ मेदगे वाजिद शेख प्रितेश भंडारी जाकिर सय्यद या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी लातूर शहरातील पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी माहिती देताना जय संघर्ष ग्रुपचे जिल्हाध्यक्ष नय्युम खाजामिय्याॅ वलांडी कर शेख यांनी पत्रकारांना माहिती दिली.