
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता. प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- आज पर्यंत आपण आपल्या राज्यात मागणी आसून हि न देणारे सरकारे पाहिली आहेत. आताचे हे आपल्या राज्यातील पहिले सरकार मागणी नसतांना देणारे सरकार आपल्याला पाह्यला मीळत आहे. महाराष्ट्र राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा हि मागणी आसून देखील भाव कमी होत नाहीत.कारण पेट्रोल डिझेलचा संबंध थेट दळणवळणाशी आहे.पेट्रोल डिझेलचे दर वाढले की महागाई वाढते.आणि महागाई वाढली मणुन हातावर पोट आसणार्यांची मजुरी वाढत नाहिये.करीता पेट्रोल डिझलचे दर कमी करण्यात यावेत आशी सर्व सामान्य जनतेची मागणी आहे.
परंतु माकणी आसून देखील महाराष्ट्र सरकार डिझेल पेट्रोलचे दर कमी करत नाहिये. परंतु मागणी नसतांना श्रीमंताच्या अय्याशीचे उंची मद्याचे दर कमी केले जात आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव-खेड्यातून ड्राइवर हा शहरी भागात येतो.किरायाच्या घरात राहतो.तुटपूंज्या पगारावर नोकरी करतो.त्यात त्याचे भागत नाहिये. मणुन ड्राइवरसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी अशी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेची मागील पाच वर्षा पासूनची मागणी आहे. त्यावर सरकार विचार करत नाहिये.
परंतु आमदारांची मागणी नसतांना ते पण कायम स्वरूपी आपले महाराष्ट्र सरकार त्यांना दीड-दोन कोटिचे घरे देत आहेत.ते पण कायम स्वरूपी.त्यांना देत आहे जे जन्माताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलीत. महोदय,, मुख्यमंत्री साहेब. वर्षाच्या 365 दिवसा मधून आमदारांना मुंबई मधे किती दिवस रहावे लागते हो.परंतु केवळ सर्व सोयीयुक्त घरे गाव-खेड्यात भाड्याने राहायला मीळत नाहित मणुन तालुक्याच्या ठिकीणी राहून दररोज ये-जा करणारे, शिक्षक,डाँक्टर, नर्स, तलाठी, ग्रामसेवक यांच्या नोकरीच्या ठिकाणी किमान नोकरीवर आहेत.
तो पर्यंत तरी राहण्यासाठीच्या त्यांच्या घरांचा विचार केला आसता तर वरील सरकारी कर्मचार्यांचा दररोजचा येण्या-जाण्याचा वेळ व पैसा निश्चित वाचला आसता.आणि त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी राहण्याचा फायदा देखील ग्रामस्थांना निश्चित झाला आसता. तुम्ही मुंबई मधे आमदारांना फ्लाँटच काय तर रो हाऊस द्या. परंतु त्यांच्याच शेजारी त्यांच्याच ड्राइवरला साधी पत्र्याची का होईना व तात्पुर्ती का आसेना एक खोली ड्राइवरला पण बांधुन द्या. कारण ड्राइवरची विश्रांती हिच सर्वांची सुरक्षा आहे.
मी संजय हाळनोर संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य.