
दैनिक चालु वार्ता
मुक्ताईनगर प्रतिनिधी
सुमित शर्मा
कुऱ्हा – काकोडा :- येथील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पदवी परीक्षेत तृतीय वर्ष हिंदी (विशेष) या विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सर्वप्रथम येत सुवर्णपदक पटकविण्याचा मान कु. पुजा गजानन नवलकार हिने मिळविला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावतर्फे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षांची विषयवार गुणवता यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार संपूर्ण विद्यापीठातून सर्वप्रथम येत तिने हे सुवर्णपदक पटकावले आहे.
कु. पुजाच्या यशामुळे कुऱ्हा-काकोडा महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे मत प्राचार्य डॉ. एस. आर. वराडे यांनी व्यक्त केले. कु. पुजा हिच्या यशासाठी हिंदी विषयाचे सहा. प्रा. पूजा पाटील व सहा. प्रा. श्री. अतुल तेली यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. वराडे तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रमोदजी शिवलकर. उपाध्यक्ष मा. श्री. डॉ. राजेंद्रजी फडके. कोशाध्यश मा. श्री. पुरणमलजी चौधरी. सचिव मा. श्री. भालचंद्रजी कुलकर्णी सर तेलि सर तसेच सर्व संचालक मंडळ व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या इतर विभागातील कर्मचारी व समाजातील विविध स्तरातील प्रतिष्टीत व्यक्तींनी अभिनंदन केले आहे.