
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- माजलगाव श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष उदयास आणला आणि सर्व वंचित बहूजनांना एकत्र करित या तीन वर्षात साहेबांनी हा पक्ष फार मोठा केला तसेच सर्व कार्यकर्त्यांनी खुपच मेहनत घेतली म्हणून आज पुर्ण भारतभर वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर माजलगाव तालुक्यात सुद्धा वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने वाढत आहे व निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे.
या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय माजलगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत पक्ष संपर्क कार्यालय ठिकाणी तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.व गरजू लोकांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसगी बीड उपजिल्हाध्यक्ष मा.भारतजी तांगडे ,जेष्ट नेते मा. विठ्ठल दादा पंडित ,जिल्हा सहसचिव मा.अंकुश जाधव , जिल्हा संघटक मा धमानंदजी साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ संजय नाकलगावकर यांनी पुढे होणाऱ्या पंचायत समिती , जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत वंचीतची सत्ता स्थापन करण्याचा दृष्टीने कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे आव्हान केले. यावेळी उपस्थित तालुका महासचिव समाधान गायकवाड ता.उपाध्यक्ष अशोक पोळ,उपाध्यक्ष संदीप फदे,उपाध्यक्ष विद्यासागर वाव्हळ ,मा मधुकरजी घनघाव, मा.यादवजी घनघाव, मा. नितीनजी फ़ंदे, विकास घनघाव, राजेभाऊ नाकलगावकर, सुनील लोंढे,प्रशांत उपदेशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते